Uncategorized
भारताने वेस्ट इंडिजला 200 धावांनी लोळवलं; विजयानंतर पांड्या म्हणाला, विराटमुळे…


दिल्ली, 02 ऑगस्ट : वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका 2-1 अशी जिंकली. विराट कोहली, रोहित शर्मा यांना तिसऱ्या सामन्यातही विश्रांती देण्यात आली होती. या दोघांशिवाय हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 200 धावांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजमध्ये भारताचा वेस्ट इंडिजवर हा सर्वात मोठा विजय ठरला. हार्दिक पांड्यानेही या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. यामुळे भारताची धावसंख्या 352 धावांपर्यंत पोहोचली