निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा
रिपाई आठवले पक्षाने केली मागणी....
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- येथील मागसवर्गीय मुलींचे तथा आर्थिक दृष्ट्या मागास मुलींचे शासकिय वसतिगृहात शुक्रवारी सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाली.निकिता शिंदे,प्रज्ञा सरकटे,सीमा चव्हाण,अंजली घेवंदे,नेहा साळवे, दिव्या खरात, यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वसतिगृहात गेल्या अनेक महिन्यापासून निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत होते. असे मुलींच्या सांगण्यावरून समजते मुलींच्या जेवणात अळ्या व इतर किडे दिसून आल्याची धक्कादायक माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव तसेच शहर अध्यक्ष राजेश भाई बोर्डे यांनी तात्काळ वसतिगृहात जाऊन विषबाधा झालेल्या मुलींची विचारपूस केली व त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. वसतिगृहातील मुलींसोबत तेथील गृहपाल यांच्याशी संबंधित घडलेल्या प्रकारची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अ समाधानकारक उत्तरे दिली आहेत हा प्रकार बऱ्याच दिवसापासून चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील जोशी गृहपाल या जाणीवपूर्वक मुलीच्या जीवीताशी खेळत असल्याचे उघड झाले आहे . संबंधित वसतिगृहामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या पुरेशा सुखसुविधा असून सुद्धा गृहपाल जोशी ह्या वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित आहे गेल्या महिन्यापासून वसतिगृहमधील मुलींसोबत बेचव जेवण देण्याचा कीळवाणा प्रकार घडत असल्याचे मुलींकडून सांगण्यात आले आहे.अशा बेजबाबदार कर्मचाऱ्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी रिपाई आठवले तालुका उपाध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी सरकारकडे केली आहे. जर सरकारने गैरवर्तनी कर्मचाऱ्यांनावर व मुलींच्या जीवीताशी खेळ करणाऱ्या गृहपाल व अधीक्षकावर तसेच संबंधित अधिकार्यांना कायमस्वरूपी निलंबणाची कारवाही न केल्यास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा रिपाई आठवले पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. असे अशायाचे निवेदन जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चिखली तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे चिखली ता. अध्यक्ष. हिम्मतराव जाधव, शहर अध्यक्ष राजेश भाई बोर्डे, ता. उपाध्यक्ष.आम्रपाल भाऊ वाघमारे, ता. यु. उपाध्यक्ष मयुर मोरे, प्रसेनजीत जाधव, नितीन कांबळे,आकाश गवई, संघप्रिय पवार, आकाश जाधव, मिलिंद लव्हाळे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.