वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळेवर येत नसल्यामुळे रुग्णांकडे होतेय दुर्लक्ष
जिजाऊ पत्रकार असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला ७ दिवसाचे अल्टिमेटंम आठव्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लागणार कुलुप
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे व रुग्णालयात डॉक्टरांना राहण्याची व्यवस्था असतानाही राहत नसल्यामुळे रुग्णांची होणारी हेडसाळ थांबवणे बाबत जिजाऊ पत्रकार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश जेऊघाले यांनी १७ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, व व आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. त्यानंतर ही भरपूर तक्रारी देण्यात आल्या,मात्र त्या तक्रारीवर आतापर्यंत कोणतीही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे सदर प्रा. आ. केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जणू बळ आल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता, प्रा.आ.केंद्रात कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे याबाबत ग्रामसभेने दि.१० ऑगस्ट २०२३ रोजी ठराव घेतलेला असतांना सुध्दा यानुसार कोणतेही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे असंख्य रुग्णांची हेळसांड होत आहे व रुग्णांना औषधोपचारापासून वंचीत राहावे लागत आहे.
तसेच कार्यालयात जे वैद्यकीय अधिकारी हे नेमून दिलेले आहेत, ते त्यांच्या कर्तव्यावर केवळ ३ तास उपस्थितीत राहतात व त्यानंतर त्यांचा कालावधी संपेपर्यंत ते रुग्णालयात दिसत नाही. वास्तविक पाहता, त्या कर्मचाऱ्याने उपस्थित राहणे अनिवार्य असून रुग्णांची सेवा करणे गरजेचे आहे. मात्र तसे होतांना दिसत नाहीत. सदर वैद्यकीय कर्मचारी हे उपस्थितीत किती वेळ राहतात याची सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केल्यानंतर सत्य बाब दिसून येईल. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांचेवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा नाईलाजास्तव ७ दिवसाचे नंतर प्रा.आ.केंद्र वरंवड च्या प्रवेशव्दारास असंख्य नागरिकांसह कुलूप लावण्यात येईल. त्या दरम्यान निर्माण होणाऱ्या व उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील. अशा प्रकारचे निवेदन जिजाऊ पत्रकार असोसिएशनचे उपअध्यक्ष यांनी प्रशासनाला दिले आहे.