२ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरच्या दरम्यान विदर्भामध्ये आम आदमी पार्टीची झाडू यात्रा.
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : – शैक्षणिक सुविधा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होण्यासाठी, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध व्हावी, बेरोजगारी समस्या दूर व्हावी याकरिता, दिल्ली प्रमाणे वैद्यकीय सुविधा महाराष्ट्रामध्ये जनतेला उपलब्ध होण्यासाठी आम आदमी पार्टीची विदर्भात झाडू यात्रा दिनांक २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्वावर वर्धा येथून सुरू होणार आहे. सदर यात्रा वर्धा येथून प्रस्थान होणार आहे तर सांगता दिनांक ११ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे होणार आहे. सदर झाडू यात्रा ही वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, मलकापूर, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर अशी राहणार आहे. एकंदरीत यात्रा १८३० किलोमीटर चालणार आहे.
दि. 4 ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीची झाडू यात्रा बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथे प्रवेश करत असुन पुढे चिखलीहून बुलढाणा येथे येणार आहे. बुलढाणा येथे गांधी भवन मध्ये यात्रेतील प्रमुख वक्त्यांची भाषणे होणार आहे. बुलढाणा येथे यात्रेचा मुक्काम असणार आहे. सदर यात्रा दुसऱ्या दिवशी बुलढाणा येथून प्रस्थान होऊन मोताळा मलकापूर खामगाव अशी पुढे रवाना होणार आहे. सदर माहिती आम आदमी पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दिपक शेषराव मापारी यांनी दिली आहे प्रेस नोट द्वारे दिली आहे.