गो. से. महाविद्यालयातील एन.सी.सी कॅडेट यांची भारतीय सैन्यामध्ये निवड
खामगाव ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी)- गो.से महाविद्यालय एन.सी.सी युनिट खामगाव येथील एन.सी.सी युनिट मधील 12 एन.सी.सी कॅडेट यांची भारतीय सैन्य व अर्धसैनिक बल यामध्ये निवड झालेली आहे. महाविद्यालयाची यांची यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा देशसेवे करता 12 एन.सी.सी कॅडेट भारतीय सैन्य व अर्ध सैनिक बल या मध्ये निवड करण्यात आली आहे. एन.सी.सी ए.एन.ओ लेफ्टनंट सुहास पिढेकर यांनी पुढे माहिती दिली एन.सी.सी मधील कॅडेट पवन मापारी व विष्णू कोथळकर हे दोन कॅडेट अग्निवीर या भरती प्रकीयेमधून भारतीय नौसेना तसेच कॅडेट प्रतीक सपकाळ, आकाश डांबरे, हर्ष मिसाळ, दत्तात्रय बोरसे व अजय राजपूत हे सीमा सुरक्षा बल (बी.एस.एफ) व कॅडेट लकी वाकोडे इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस तसेच कॅडेट अभिषेक कळसकार एक कॅडेट हा आसाम रायफल तसेच कॅडेट भूषण थोरात, यश खूपसे व गौरव भातखेडे, यांची निवड हि अग्निवीर या भरती प्रकीयेमधून भारतीय सैन्य या मध्ये झाली आहे. महाविद्यालय तर्फे सर्वच विद्यार्थ्यांचे खूप कौतुक आणि गुणगौरव करण्यात येत आहे. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सांगितले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव हे राज्यातच नव्हे तर देशभरात मोठे केलेले आहे. एनसीसी कॅडेट यांनी महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. अशोकजी झुनझुनवाला यांनी निवड झालेल्या कॅडेट यांचा कौतुक केले तसेच अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी सांगितले की महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट यांना वेळोवेळी स्पर्धा परीक्षा व सैन्य भरती करता मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर 13 महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगाव या बटालियन पी.आय स्टाफ व कमांडिंग ऑफिसर तसेच एनसीसी ए.एन.ओ सुहास पिढेकर हे एनसीसी कॅडेट यांना सैन्य भरती साठी शारिरीक व लेखी परीक्षेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात व नेहमी प्रयत्न शील असतात याचेच फळ म्हणून महाविद्यालय मधून जास्तीत जास्त कॅडेट हे सैन्य भरतीमधे निवडले जातात. ही खूप अभिमानाची बाब आहे.
बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित भटनागर यांनी एनसीसी कॅडेट कौतुक केले तसेच माहिती दिली की गो.से. महाविद्यालय मधील एनसीसी कॅडेट हे प्रत्येक कॅम्पला अग्रेसर असतात आणि कॅम्पमध्ये विविध प्रकारांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम शूटिंग, ड्रिल या प्रकारामध्ये सुद्धा गो.से महाविद्यालयामधीलच एनसीसी कॅडेट हेच प्रथम येतात. कॅडेट यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ए. एन. ओ लेफ्टनंट सुहास पिढेकर, CTO. डॉ. धरमकार तसेच बटालियन मधील पीआय स्टाफ सुभेदार मेजर धर्मेंद्र सिंग, सुभेदार राजेंद्र ढगे, सुभेदार राजेंद्र पाल, सुभेदार कमल किशोर, विशाल ठाकूर, कॅडेट यांचे अभिनंदन व गुणगौरव केला तसेच एनसीसी कॅडेट यांनी सुद्धा अभिनंदन केले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.