कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा-रा.काँग्रेस तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने
बुलढाणा- तालुका प्रतिनिधी राहुल गवळी :- माननीय मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने राज्यातील नोकर भरतीच्या बाबतीत घेतलेला कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय बेरोजगार तरुणांसाठी योग्य नाही. ग्रामीण भागात पहिलाच रोजगार नाही. ग्रामीण भागातील मुले शिक्षक, पटवारी, ग्रामसेवक, पोलीस, क्लर्क अशा तत्सम स्वरूपाच्या नोकरी मिळवत असतात. कंत्राटी नोकर भरतीमुळे सदर मुलांना या क्षेत्रात वाव नाही. ग्रामीण भागात इंडस्ट्रियल एरिया नाही. त्यामुळे कंपनीत सुद्धा काम मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. आपण घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयामुळे युवक वर्गामध्ये तीव्र संतोष निर्माण झालेला आहे. अनेक युवक नैराश्याच्या गर्दीत जात आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. भविष्यात बेरोजगार असल्याने नैराश्य आल्याने हेच युवक व्यसनाधीन होतील त्यातूनच पुढे आत्महत्या करण्याचे प्रमाण सुद्धा वाढेल. त्यामुळे आपण घेतलेला कंत्राटदार भरतीच्या निर्णयाचा फेरविचार करून सदर निर्णय तात्काळ मागे घ्यावा, याबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात देण्यात आले.
यावेळी बुलडाणा तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने, मनीष बोरकर, अनिल वर्मा, विशाल फदाट, पंजाबराव गवई, महेश देवरे, श्रीराम सुसर, संदीप जाधव, सुनील सोनुने, किरण पाटील, निलेश गाडेकर, दिनकर पांडे, नयन कांबळे, गौरव देशमुख, रामेश्वर चौधरी, मयूर चौधरी, अक्षय डोमळे, सचिन चौधरी, अतुल फोलाने, मधुकर कांबळे, रफिक भाई यांची उपस्थिती होती.