बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ कडून कर्मचाऱ्यांना वृक्षांचे वाटप
बुलढाणा- तालुका प्रतिनिधी राहुल गवळी :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली यंदाच्या दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता मंडळाच्या वतीने मर्यादित स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
गणेश मंडळाचे यावर्षी 22 वे वर्ष असून यावर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवानिमित्त संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनंता भाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि 25 सप्टेंबर रोजी संस्थेच्या गोवर्धन ईमारतीच्या तळमजला्यातील पार्किंगमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वृक्षारोपण वृक्ष लावा- बक्षिस मिळवा या धरतीवर वृक्षारोपण आंबा वृक्षांचे वाटप बुलडाणा अर्बन संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुकेशजी झंवर ,आणि संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या शुभहस्ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
यावेळी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकारिणी चे सर्व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या आंबा वृक्षांचे वृक्षमित्र म्हणून कर्मचाऱ्यांनी त्याचे वर्षभर संगोपन करण्यात येईल, आणि झाडाच्या बुंध्यापासून उंची प्रमाणे पुढिल वर्षी बक्षीस वाटप करण्यात येईल. आणि दि. 27 सप्टेंबर बुलडाणा अर्बन कर्मचारी ऑर्केस्ट्रा सांयकाळी 7 वाजता गोवर्धन इमारत येथे होणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री अभय पावडे सचिव संजय राजगुरे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.