पाडळी शिंदे येथे नवनियुक्त तंटामुक्ती समितीचे गठण
देऊळगाव राजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- तालुक्यातील पाडळी शिंदे येथे नुकतीच नव्याने तंटामुक्ती समितीचे गठण करण्यात येऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष पदी हभपएकनाथ महाराज शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी यादवराव जाधव मामा यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर संचालक म्हणून रविंद्र वाळु, हिम्मतराव शिंदे, सुरेश शिंदे,बबन शेळके, रमेश देशमुख, समाधान शिंदे या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाने अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.व गावातील विविध विषयांवर चर्चा केली.गावातील गुन्हेगारी चे प्रमाण तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून कमी करण्याचे आवाहन ठाणेदार विकास पाटील यांनी केले असता तंटामुक्ती समितीने एकमुखाने नक्कीच गावातील छोटे छोटे गुन्हे आपापसात सलोख्याने मिटविले जातील तसेच तंटामुक्ती समितीच्या वतीने गावातील तंटे गावातच निकाली काढण्याचे आश्वासन समितीने ठाणेदार विकास पाटील यांना दिले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.