राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राहुल गवळी :- बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पूर्णकृती स्मारकाचा भूमिपूजन सोहळा दि १ ऑक्टोंबर रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला,यावेळी नगरपालिकेचे मा. आरोग्य सभापती आशिष जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देखील देण्यात आल्या.
त्या ठिकाणी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, शिवसेना महिला तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, शिवदूत तालुका समन्वयक नितीन राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, शिवसेना शहर कार्याध्यक्ष आकाश दळवी, शिवसेना शहर संघटक महिला वैशालीताई ठाकरे, युवती सेना शहर संघटक रामेश्वरीताई चव्हाण, शिवसेना माजी शहरप्रमुख सुनील भाग्यवंत,मुन्नाजी बेंडवाल, नगरसेवक विजय जायभाये, बाळासाहेब धुड, मंदार बाहेकर, दीपक सोनवणे उदयदादा देशपांडे, मोहन पराड, अरविंद होंडे, कैलास माळी, उमेश कापुरे,रामेश्वर वावरे,रमेश गायकवाड, मनोज यादव, गोविंद खुमकर, पुरुषोत्तम हेलगे, गोटू शर्मा,श्री शाम पवार,निषाद येरमुले, यांच्यासह समस्त शिवसेना भाजप युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य समाज बांधव उपस्थित होते.