स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राहुल गवळी :- स्वच्छता पंधरवडा निमित्त स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ या उपक्रमाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार नगर पालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि जिल्हा ठिकाणी विविध शासकीय कार्यालयात स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले.
मेहकर शहरात खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संकल्प घेऊन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित नागरीकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. शेगाव येथे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
लोणार येथे तहसील कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा तहसील कार्यालयात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. जळगाव जामोद येथे महसूल व नगर पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देऊळगाव राजा येथे सेवा पंधरवडा निमित्त नगर परिषद वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मोहिमेत शाळेतील विद्यार्थी व शहरातील पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले.
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
लासुरा, ता. शेगाव येथे महा श्रमदानातून वनराई बंधारा साकारण्यात आला. तसेच शेगाव नगरपालिकेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खामगाव येथे तलावाची स्वच्छता करण्यात आली.