Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी श्रीमती कुलकर्णी, वार्ड इन्चार्ज, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांचे समुपदेशक श्री सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, श्री. साबळे, घनश्याम बेडवाल आदी उपस्थित होते.