Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली
राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजिवनी मोपळे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, स्वीय सहायक रविद्र लहाने, नाझर गजानन मोतेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.