डोंगरखंडाळा ग्रामपंचायत व श्री संभाजी राजे विद्यालय आणि सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा यांच्या वतीने गावात राबविली स्वच्छता मोहिम…
स्वच्छ भारत मिशन अतंर्गत गावात राबविण्यात आले स्वच्छता मोहिम…
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अजय राजगुरे- बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात अतिशय चांगल्या प्रकाराचे उपक्रम राबविण्यात आले आहे. दि १ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत मिशन अतंर्गत गावात स्वच्छतेची मोहिम राबविण्यात आली आहे. ग्रामपंचायत डोंगरखंडाळा व श्री संभाजी विद्यालय आणि सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा यांच्या वतीने एकत्रित येउन गावात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला गावकरी,सदस्य,शिक्षक वृंद कर्मचारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात या मोहिमेत सहभाग घेउन गाव स्वच्छ करताना आपले योगदान दिले आहे.
२ ऑक्टोंबर देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले. यांचे औचित्य साधून ग्रामपंचायत व श्री संभाजी राजे विद्यालय आणि सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा यांनी गावात पसरलेली अस्वच्छता साफसफाई करून स्वच्छ केली आहे.सर्वप्रथम गावातील सिध्देश्वर मंदिर व हनुमान मंदिर या ठिकाणी सर्व विद्यार्थी जमा झाले. त्याठिकाणी ग्रामपंचायात व प्राचार्य शिक्षकयांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.त्यानंतर मंदिरामधून विद्यर्थ्यांची स्वच्छता अभियानची गावात रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालतांना रस्त्यावरील घाण म्हणजेच कचरा साफसफाई केली. सर्व कचरा हा एका पोतीडीमध्ये जमा करून त्याची योग्य ठिकाणी विलेवाट लावली आहे. विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये स्वच्छता पाळा रोगराई टाळा,स्वच्छ गाव निरोगी गाव, झाडे लावा झाडे जगवा,माझा भारत स्वच्छ भारत असे घोषणाचे फलक तयार करून घोषणा दिल्या आहे.तसेच सहकार विद्या मंदिर डोंगरखंडाळा च्या वतीने उदयनगर कडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रमुख्याने साफसफाई करण्यात आली आहे.या मोहिम मध्ये गावातील नागरीक सुध्दा मोठ्या संख्याने सहभागी होउन स्वच्छतेमध्ये आपले योगदान दिले आहे.
डोंगरखंडाळा या गावात हि मोहिम राबविण्यात आली आहे. हि सर्वांसमोर एक आर्दश ठेवलेला आहे.आपले गाव स्वच्छ ठेवले म्हणजे रोगराई पसणार नाही असा उद्देश गावातील लोकांचा आहे त्यासाठी सर्वांत पहिले आपणच पुढकार घेतला पाहिजे.
या स्वच्छतेच्या मोहिममध्ये डोंगरखंडाळा ग्रामपचांयतचे सरपंच श्री बबनलाल गाडगे,ग्रामविकास अधिकारी तुकाराम सदावर्ते सर,
ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सदस्या, श्री संभाजीराजे महाविद्यालयचे प्राचार्य रविंद्र बरडे सर,संचालक गोकुळ कोल्हे सर, सहाकर विद्या मंदिरचे प्राचार्य श्री सतिश रोहडे सर,साळुके सर,दोन्ही शाळेचे शिक्षकवृंद वर्ग कर्मचारी वर्ग, गावातील सदगुरू गोविंदास महाराज भजनी मंडळी, गावातील सहकारी संस्था, समस्त गावकरी मंडळी,आरोग्य कर्मचारी, आशावर्कस,मोठ्या संख्याने या स्वच्छतेच्या मोहिम मध्ये सहभागी होउन आपले योगदान या स्वच्छेतेसाठी दिले आहे.