रोहिणखेड येथे मेरी माटी मेरा देश अभियान उत्साहात संपन्न
मा.आमदार विजयराज शिंदे यांनी अमृत कलश घेऊन गावात केली पदयात्रा
मोताळा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पने नूसार ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत मौजे रोहिणखेड ता.मोताळा येथे आज दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजपा व ग्रामस्थांच्या वतीने “अमृत कलश यात्रा” आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा नेते लोकसभा निवडणूक प्रमुख मा.आमदार विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे अशोक वाटिका साकारत आहे यामध्ये देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मातीचा अंश असावा या उद्दात हेतूने ही यात्रा काढली जात आहे. रोहिणखेड येथे अमृत कलश पदयात्रेत मा.आमदार विजयराज शिंदे यांनी पवित्र कलश घेऊन आपल्या सहकाऱ्यां समवेत गावातून “मेरी माटी मेरा देश” ” ” भारत माता की जय ” अश्या घोषणा देत पदयात्रा केली. दरम्यान ग्रामस्थ,महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात पवित्र अमृत कलश यात्रेचे स्वागत केले. ठिकठिकाणी अंगणात रांगोळी घालून , कलशाला औक्षण करून तुळशी वृंदावनातील माती, तुळशीचे पाणी आणि तांदूळ टाकून देशासाठी बलिदान देणाऱ्या पवित्र हुतात्म्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला. यावेळी मुस्लिम बांधवांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती.
यावेळी श्री विश्वंभरआप्पा पंधाडे, श्री राजु सुरपाटणे, श्री संतोष सोनोने, श्री प्रकाश आवटे, श्री सुरेश सराग, श्री गजानन आवटे, डॉ. वैभव इंगळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ पूनम जयस्वाल, श्री राजू गुजर, श्री संजय भारोटे, राजू सरोदे, श्री कैलास लिंगायत, श्री बाळू तोतरे, श्री शक्ति पाखरे, श्री गोपाल तोत्रे, श्री संजय कचोरे, श्री सुनील सावळे, श्री सुमनबाई करंगळे, यशोदाबाई सुरपाटणे, सौ राधा सुरपाटणे, लताबाई पाखरे,शुभम जटाळे, पिंटू मगरे, अनिल सुग्रमकर, राजू देशपांडे,अन्सार अल्ताफ, शेन्फड इंगळे ,अशोक बाहेकर ,दत्ता शिंदे यांसह भाजपा पदाधिकारी ग्रामस्थ, महिला भगिनींसह युवामित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.