जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रीयेतील प्रवेशपत्र उपलब्ध
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : – ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेकरीता दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरळसेवा भरती प्रक्रीया २०२३ करीता रिगमन व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गातील परीक्षा दि. ७ ऑक्टोबर २०२३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या संवर्गाची दि. ८ ऑक्टोबर २०२३, विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्यपर्यवेक्षक या संवर्गातील परीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२३ आणि निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची परिक्षा दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.
सदर संवर्गातील परीक्षेकरीता प्रवेशपत्र zpbuldhana.maharashtra.gov.in या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन नोडल अधिकारी तथा साप्रवि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.