बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर
५ नोव्हेंबरला मतदान तर सहाला निकाल
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत त्याची सेमी ट्रायल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार ता तीन रोजी घोषित केला. बुलढाणा जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार आहेत. एकूण ८३ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार असून पाच नोव्हेंबर रोजी मतदान तर सहा रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकात राजकीय पक्षांचा कस लागणार असून पुढील निवडणुकींच्या मोर्चे बांधणीसाठी अधिका अधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्याची ठरणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशा मुळे ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहितेला प्रारंभ झाला आहे जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायत मध्ये ७५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार आहे. यापूर्वीच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या ८ रिक्त जागांसाठी जनतेतून मतदान होणार आहे.५९ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून जिल्ह्यातील ७५ ग्राप सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. जिल्ह्यात एकूण ८३ जागांवर निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने २७ जुलै २०२३ रोजी मतदार यादी कार्यक्रमा नुसार राज्यातील जानेवारी२०२३ ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या नवनिर्मित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या सुमारे २२९८ ग्रामपंचायत व निधन राजीनामा अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे सदस्य थेट सरपंचाच्या जागा रिक्त असलेल्या २०६७ ग्रामपंचायत येथील २९५० सदस्यांच्या व १३० थेट सरपंचांच्या रिक्त जागांसाठी २५ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे
तहसीलदारांकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध: शुक्रवार ६ ऑक्टोंबर, उमेदवारी अर्ज दाखल मुदत: सोमवार १६ ते शुक्रवार २० ऑक्टोंबर वेळ सकाळी ११ते दुपारी ३ पर्यंत,अर्जाची छाननी: सोमवार २३ ऑक्टोंबर ११वाजता पासून संपेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत: बुधवार २५ ऑक्टोंबर दुपारी तीन वाजेपर्यंत,उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह वाटप: २५ ऑक्टोंबर दुपारी तीन नंतर मतदान: रविवार ५ नोव्हेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत,मोजणी व निकाल: सोमवार ६ नोव्हेंबर