बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा संगम चौक येथे जल्लोष
बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी दिलीप वळसे पाटील
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांचे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका बुलढाणा च्या वतीने डी एस लहाने व त्यांचे सर्व सहकारी यांनी संगम चौकामध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालकमंत्री झाल्यामुळे निश्चितपणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांसह इतर सामान्य व्यक्तींना सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून न्याय मिळेल अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली. यावेळी माधवराव शेळके अनिल वर्मा मनीष बोरकर अनुजा ताई सावळे संदीप जाधव किरण पाटील मंगेश बिडवे गौरव देशमुख विशाल विशाल सोनवणे पंजाबराव गवई जयश्रीताई बोराडे सागर काळे प्रतीक काळे नारायण मोहरकर ज्ञानेश्वर शेळके एसटी सोनवणे आदी लोक मोठ्या संख्याने या ठिकाणी उपस्थित होते.