Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

दुधा घाटात घडला भिषण अपघात एसटी बस कोसळली…

मलकापूर वरून छत्रपती संभाजीनगर कडे जात होती

Spread the love

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- धाड बुलढाणा रस्‍त्‍यावरील दुधा घाटात दि ६ ऑक्‍टोंबर रोजी सकाळी
सव्‍वा सहाच्‍या सुमारास एसटी बस कोसळली. एम एच ४० वाय ५४८१ क्रमांकाची मलकापूर आगाराची ही बस मलकापूरवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. दुधा घाटात अचानक ही बस कोसळली. सुदैवाने २० ते २० फुटांवर असलेल्‍या सागाच्‍या
झाडात बस अडकल्‍याने बसमधील प्रवाशी वाचले.अपघात झाला त्‍यावेळी चालक आणि वाहक मिळून बसमध्ये १३ जण होते. त्‍यात ५ महिला प्रवाशी होत्‍या.पी गावंडे ३५ रा. मलकापूर, असे चालकाचे नाव असून राजेंद्र रामजी गीते ४५ रा.मलकापूर, असे वाहकाचे नाव आहे. अपघात व्‍हायच्‍या ५ मिनिटाआधी दुधा येथे एसटी महामंडळाच्‍या तपासणी पथकाडून बसची तपासणी झाली होती.

त्‍यानंतर तपासणी पथक धाडकडे जात असताना त्‍यांच्‍या समोरच हा अपघात झाला. त्‍याच वेळी बुलढाणा आगाराची दुसरी बस छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्‍या बसमधील प्रवाशी व एसटी महामंडळाच्‍या तपासणी पथकाच्‍या कर्मचाऱ्यांनी अपघात ग्रस्‍त बस मधील प्रवाशांना एसटी बसचा समोरील काच फोडून बाहेर काढले. जीवाच्‍या आकांताने बसमधील प्रवाशी ओरडत होते.अपघातात बसच्‍या चालकासह ४ ते ५ प्रवाशी जखमी झाले आहेत. म्‍हणून वाचले प्रवाशी बस बुलढाण्याकडून धाडकडे जातांना उतारावरील वळणावर वळण न घेता घाटात शिरली. बस सरळ घाटात शिरल्‍यानंतर झाडांना धडकून पलटली. बसने एकच पलटी घेतली आणि लगेच झाडांना अडकल्‍यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला बस झाडांना अडकली नसती तर मात्र अनर्थ घडला असता अशी चर्चा घटनास्‍थळी सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page