माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री शिवसेना जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छ भेट
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दि ६ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मलकापूर रोड स्थित असलेले मातोश्री शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील अपंग तसेच दिव्यांग बांधवांच्या समस्यांबाबत देखील आमदार संजय गायकवाड यांनी माजी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या सोबत चर्चा केली, तसेच जास्तीत-जास्त योजना ह्या प्रत्येक अपंग तसेच दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचवू असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
यावेळी त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष सौ पुजाताई संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पृथ्वीराज संजय गायकवाड, यांच्यासह शिवसेनेचे समस्त पदाधिकारी तथा शिवसैनिक उपस्थित होते.