रवींद्र साळवे यांच्या पुस्तकांचे रविवारी प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- रवींद्र साळवे यांनी लिहिलेल्या ‘आश्वासक’ व ‘समकालीन संदर्भाचा अन्वय’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन व परिवर्तन साहित्य पुरस्काराचे वितरण रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
स्थानिक जिजामाता महाविद्यालयात हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न होणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर व महाराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव सिद्धार्थ खरात हे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. ‘निशाणी डावा अंगठा’ कार सुप्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर अध्यक्षस्थानी असणार आहेत.
‘आश्वासक’ हे पन्नास व्यक्ती आणि संस्था वरील लिखाणाचं पुस्तक आहे. तर ‘समकालीन संदर्भाचा अन्वय’ हे समकालाचं चिंतन असलेलं पुस्तक आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील लेखक साहित्यिक यांनी उपस्थित राहावे असे आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.