विहिरीतील पाईप फोडल्याच्या कारणावरून दहीभात X दहीभात एकमेकांना भिडले!
डोके फोडून चावा घेतला खामगाव तालुक्यातील घटना!
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भागवत राउत :- विहिरीतील पाईप फोडल्याच्या कारणावरून दहीभात X दहीभातांनी चक्क डोके फोडुन चावा घेतल्याची घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव गावात घडली आहे.
झाले असे की,विहिरीतील पाईप फोडल्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर दामोदर दहीभात (वय ३५ वर्ष, रा.हिंगणा कारेगाव) याला सौ शारदा प्रशांत दहीभात यांनी ४ आक्टोबर रोजी ३ वाजताच्या दरम्यान शिवीगाळ केली. प्रशांत अंबादास दहीभात याने हातात दगड घेवून ज्ञानेश्वर दहीभात याचे डोके फोडले आहे. सौ शारदा दहीभात, राजकन्या अंबादस दहीभात यांनी दोघांनी ज्ञानेश्वर दहीभात याला पकडून ठेवले. प्रशांत दहीभात याने ज्ञानेश्वर दहीभात याच्या बोटाला चावा घेतला आहे. ज्ञानेश्वर याला जीवे मारण्याचा धमक्या दिल्या आहेत.असे ज्ञानेश्वर दहीभात यांनी आज ४ आक्टोबर रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या आपली तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे यातील तक्रारदार व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पुढील तपास पोहेकॉ शिवाजी दळवी हे करीत आहेत.