चिखली येथे श्री विश्वकर्मा फर्निचर कारागीर युनियन स्थापन…
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- फर्निचर कारागीर बांधवानी स्पर्धेच्या या युगात कुठेही कमी पडता कामा नये,
आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती घेवुन आणि उत्पादने वापरून आपला व्यवसाय अधिक प्रभावीपणे संघटित रित्या करून
ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी वेळेत,करून उत्कृष्ठ काम व्हावे, सर्वांचे मजुरीचे दर सारखेच असावे यासाठी चिखली
तालुक्यातील सर्व फर्निचर क्षेत्रातील कारागिरांनी एकत्र येवून श्री विश्वकर्मा फर्निचर कारागीर युनियन स्थापन करण्यात आली.
या व कारागिरांनी विश्वकर्मा बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचत सुरू केली या बचत गटाचा दुसरा वर्धापन दीन
व फर्निचर कारागीर मेळावा ,०१ ऑक्टोंबर रोजी चिखली येथे संत खटकेश्वर बाबा संस्थान येथे संपन्न झाला.
युनियन च्या निर्णयानुसार फर्निचर कामाचे दर मटेरीयल च्या 30% असतील असे जाहिर करून तसे युनियनचे
दर पत्रक प्रकाशन केले, यावेळी , इंजि असोसिएशन चे अध्यक्ष अजय राजपूत, देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी समाधान
भाऊ गाडेकर,विश्वकर्मा महिला अर्बनचे मार्गदर्शक समाधान सुरोशे सर, डॉ विजय खोलाडे, कारागीर युनियनचे
अध्यक्ष दिपक शर्मा, युनियन चे उपाध्यक्ष श्रीराम वानखडे, उत्कृष्ठ,बहारदार संचालन करणारे अनंत राउत सर व
या यूनियन चे मार्गदर्शक सतिश शिंदे हे उपस्थितीत होते.
यावेळी तालुक्यातील फर्निचर क्षेत्रांतील विविध समाजातील कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर युनियनच्या सदस्य यांचा विमा काढण्यात येईल युनियनच्या सदस्यांना विविध प्रकारच्या फर्निचरच्या
प्रदर्शनाला भेट देण्यात येतील या कार्यक्रमासाठी अधिक आधुनिक उत्पादने कशी वापरावी यासाठी विविध
प्रकारचे वर्कशॉप सुद्धा घेण्यात येतील फर्निचर व्यवसायाला गती देऊन ग्राहकांना कमी वेळेत उत्कृष्ट सेवा
देण्याची जबाबदारी सुद्धा या योजनेने घेतलेली आहे.ग्राहकांनी युनियन कडेच आपले फर्निचर ची कामे द्यावीत
म्हणजे ती अधिक प्रभावीपणे, व वेळेत पुर्ण करण्यात येईल असे सुद्धा यावेळी फर्निचर कारागीर कारागिरीचे
अध्यक्ष दीपक शर्मा यांनी सांगितले आहे