मेरा बुद्रुक येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मधे बदली प्रकरण शाळा बंद व सोमवारी गाव बंदीचे आव्हान
शिवाजी शाळा अमरावती समिती सदस्य यांचे दुर्लक्ष विद्यार्थी नसल्यामुळे शाळेत शुकसुकाट.
अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिले गाव बंदचे निवेदन.
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील मेरा बु. या गावातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातीत शिक्षक एस.बी. सोळंकी यांच्या बदली दुसरीकडे झाली ही वार्ता गावात पसरतास शाळेतील विद्यार्थी ,शाळा समिती सदस्य, पालक वर्ग , गावकरी व ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी शाळेमध्ये धाव घेऊन दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२३आक्रमक होऊन शाळेचे प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी गेले . सर्व समक्ष प्राचार्यांनी बदलीचे कारण सांगितले असता ग्रामस्थ व पालकांचे समाधान न झाल्याने जोपर्यंत एस.बी.सोळंकी सरांची बदली रद्द करून त्यांना या शाळेवर घेत नाही तोपर्यंत शाळेतला एकही विद्यार्थी आम्ही पाठवणार नाही अशी भूमिका घेतल्याने एकच खळबळ उडाली.
यावेळी गावकरी व पालक यांनी प्राचार्यावर विविध आरोप केले. त्यामध्ये प्राचार्य हे दीड वर्षापासून या शाळेवर कार्यरत असून सेवा देत आहेत त्यांच्या बाबतीत अनेक आजपर्यंत तक्रारी आलेले आहेत .त्यांच्या कार्यकाळात शाळेची विद्यार्थी पटसंख्या कमी होणे, विद्यार्थी शालेय पोषण आहारा सुद्धा नेहमीच भ्रष्टाचार ,अपरातफर, गावकऱ्यांशी असलेली उद्धट वागणूक ,शाळेवर येण्या-जाण्यासाठी वेळ सुद्धा निश्चित नाही, शाळा समिती सदस्यांना कोणत्याच कामात विश्वासात घेतल्या जात नाही .अशी अनेक कारणे आहेत बायगाव ,कवठळ,गुंजाळा,मनुबाई चंदनपुर अंत्रीखेडेकर येथील संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी न सोडवल्यामुळे त्यांनी दुसऱ्या शाळेत यावर्षी प्रवेश घेतलेला आहे. गावातील इयत्ता सातवी मधील पंधरा विद्यार्थी शाळा सोडून साखरखेर्डा येथे बाहेरगावी स्थलांतरित झालेले आहेत. इयत्ता अकरावीची पटसंख्या कमी झालेली आहे ,कनिष्ठ महाविद्यालयावर एकच शिक्षक हेतू पुरस्कार पणे घेतला नाही ,शासनाचा आदेश असून सुद्धा “स्वच्छता मोहिमेत” भाग घेतला नाही. प्राचार्य शेख सर हे वर्ग आठवीच्या विज्ञान विषय शिकवतात आणि तो अभ्यास नेहमीच अपूर्ण असतो असे अनेक आरोप पालक व गावकऱ्यांनी लावले आहेत.
अशा प्रकारची श्री शिवाजी विद्यालय मेरा बुद्रुक येथील मुख्याध्यापकाची बदली बाबत श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्षांना यांनी यावेळी विनंती अर्ज खुद मुख्याध्यापकाच्याच हस्ते देण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला नवीन प्राचार्य देण्यात यावा अन्यथा आम्हाला शाळा बंद आंदोलन करून आमच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचा दाखला काढून घेण्यात येतील असा गंभीर इशारा देखील यावेळी देण्यात आला. यामध्ये शाळा समिती सदस्य, पालक, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या सह्या आहेत. सहा ऑक्टोबरला दिवसभर या घटनेने शाळा बंद होती तर दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबरला शनिवारी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. त्यामुळे शाळेमध्ये शुकशुकाट होता .परत सोमवारी गावकरी व पालक यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना सोमवारी” गाव बंद” निवेदन दिले. जोपर्यंत सोळंके सर शाळेवर रुजू होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत येणार नाही असा विद्यार्थ्यांनी पवित्रा घेतला. प्राचार्य शेख सर यांच्या बदलीसाठी पालक व गावकरी आक्रमक झाले होते.यावेळी प्राचार्य शेख सर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये माझा काहीही वैयक्तिक सहभाग नाही. सोळंकी सरांची बदली ही प्रशासकीय बदली आहे. त्यामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही. तर ग्रामस्थ व पालक यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत सोळंकी सर शाळेवर येत नाही व प्राचार्य शेख यांची बदली होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये एकही विद्यार्थी येणार नाही. आम्ही पाठवणारही नाही. व मुलांचे शाळा सोडण्याचे दाखले काढण्यात येतील अशी पालकांनी भूमिका घेतली.
शाळेमध्ये या नाट्यमय घडामोडी घडत असतानाच शाळेचे प्राचार्य शेख सर यांनी संस्थेचे हेमंत काळमेघ यांना विनंती अर्ज करून दिलेल्या विनंती अर्ज मध्ये पर्यवेक्षक एस. बी .सोळंकी यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी गावातील पालक, सर्व ग्रामस्थ विद्यार्थी यांच्यासमोरच विनंती अर्ज तयार केला. यावेळी विद्यार्थ्यासह शाळा समिती सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्ग व ग्रामस्थ पत्रकार मंडळी यांची उपस्थिती होती. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना सोमवारच्या गावबंदचे निवेदन देत असताना त्यामध्ये शिवसेना नेते राजेंद्र पाटील, सुनील पडघान, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान ,माजी सरपंच मच्छिंद्र डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य भरत पडघान सह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.