बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली जिल्ह्यात तब्बल ९ महिन्यांत ५५७ मुली गायब!
९० अल्पवयीन मुलींचे किडनॅपिंग! ७६ जणींवर झाले बलात्कार; २७८ जणींवर वाईट नजर..
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येउन गेल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीला त्या उपस्थित राहिल्या महिलांनी न घाबरता त्यांच्यावर झालेल्या अन्याय ,अत्याचाराला वाचा फोडावी असे आवाहन त्यांनी केले आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना कमी व्हाव्यात, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी राज्य महिला आयोग काम करीत असते. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बुलडाणा जिल्ह्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या,९ महिन्यांत जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना काही कमी नाहीत. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यात महिला, मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढलेले आहे. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत ५५७ मुली व महिला गायब झालेल्या आहेत. यातील बहुतांश मुली या अविवाहित आहेत.
गेल्या ९ महिन्यांत बेपत्ता झाल्याची ८४४ प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यात ९१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहेत. ९१५ पैकी ५५७ महिला तर ३२८ पुरुषांचा समावेश समावेश आहे.
याशिवाय १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ९० मुली गायब झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात किडनॅपिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. ९० पैकी ५५ जणींचा पोलिसांनी यशस्वी शोध घेतला असला तरी ३५ अल्पवयीन मुली कुठे आहेत हे अद्याप नाही. ज्या ५५ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले त्यापैकी काहींवर किडनॅपिंगनंतर बलात्कार झाल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय महिलांवरील अत्याचारांच्या इतरही अनेक घटना ९ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात घडल्या आहेत.
विनयभंगाची २७८ प्रकरणे जिल्ह्यात दाखल झालेली आहेत. महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, छेडछाड करणे, शरीरसुखाची मागणी करणे, वाईट उद्देशाने स्पर्श करणे अशा बाबी विनयभंग या प्रकारात मोडतात. याशिवाय जिल्ह्यात घरघुती हिंसाचाराची प्रकरणे देखील मोठी आहेत. ९ महिन्यांत अशी ८५ प्रकरणे दाखल झाली आहेत.