हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुदंर अभियान पथकाने बुलडाणा बसस्थानकाची केली पाहणी
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुदंर अभियान अंतर्गत जळगाव विभागाच्या पथकाने आज दि १३ ऑक्टोबर रोजी बुलडाणा बसस्थानकाची स्वच्छते बाबत पाहणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,जळगाव विभागाचे उपयंत्र अभियंता अजय पाटिल सर यांनी सिटी न्युज व दैनिक जनसंचलनशी बोलतांना सांगितले की, स्वच्छ सुदंर बसस्थानक अभियान अंतर्गत बुलडाणा बसस्थानकाची पुर्ण स्वच्छता व बाहेरील परिसर बसेसची स्वच्छता,प्रवाशी महिलांना,हिरकणी कक्ष, बसस्थानकाची रंगरंगोची या विषयी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मुल्यकन तक्ता दिलेला आहे ज्या मध्ये रंगरंगोची बसस्थानकाला केलेली आहे की नाही,बसस्थानकाचा परिसर स्वच्छ आहे किंवा नाही,प्रवाशाची बसण्याची व्यवस्था स्वच्छ आहे किंवा नाही, तसेच इतर सोयी व्यस्थीत आहे किंवा नाही जसे प्लॅट फॉर्मवर रुटबोर्ड,
शेडूल बसस्थानकाचे,येणा-या जाणा-या फे-याची माहिती या सर्व गोष्टी निर्देशनात देऊन हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र मध्ये २१ डिवीजन आहे.१०० मार्काचे मुल्याकन असते.दर दोन महिन्याने हे पथक येते.या पथक मध्ये उपयंत्रअभियंता,कामगार अधिकारी,स्थापत्य अभियंता, स्थानिक पत्रकार असे या पथक मध्ये आहे. बसची संपुर्ण प्रकारे स्वच्छता बाबत पाहणी केली आहे.