बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचा येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथे दि .१३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि १५ ऑक्टोबर २०२३ पासुन नवरात्र नवदुर्गा उत्सव सुरु होत आहे. हा उत्सव शांतेत पार पाडवा या साठी आज बुलढाणा शहरातील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष सदस्य व शांतता कमिटीची पदाधिकारी उपस्थित होते. या मिटींग मध्ये शासनाचे जे निर्देश आहे.ते सर्वांना समजून सांगण्यात आले व त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सव दरम्यान डिजेचा वापर जो आहे तो करण्यात येऊ नये.या डी जे मुळे होणारे दुष्परिणाम सर्वांना समजून सांगण्यात आले. जो कोणी डिजेचा वापर करेल त्या डिजेचा आवाज तपासुन त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही मंडळाच्या पदाधिका-यांनी डिजे वाजविण्याचा निर्णय मागे घेऊन अतिशय चांगला उपक्रम घेऊन टाळ मुर्दूंग भजनी मंडळीचा निर्णय घेतला आहे.२४ मंडळा पैकी एक मंडळाने हा निर्णय घेतला. बाकी मंडळ सुध्दा योग्य निर्णय घेणार आहे.
शांतता कमिटीची हि बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी साहेब,व पोलिस उपविभागीय अधिकारी वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार संपन्न झाली.या बैठकीला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर,शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी,नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शांतता कमिटीची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.