विभागीय रनिंग स्पर्धेसाठी सिद्धांत रोठेंची निवड.
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जिल्हास्तरीय 100 मीटर आणि 400 मीटर स्पर्धेत अंडर फोर्टीन मध्ये भारत विद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत सतीशचंद्र रोठे प्रथम आला असून त्याची १७ आक्टोंबरला अकोला येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
13 ऑक्टोबरला जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा या ठिकाणी क्रीडा व युवक संचालनालय पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , जिल्हा क्रीडा प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम तालुका आणि जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे दोन दिवशीय आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सिद्धांतची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सदर यशाचे श्रेय सिद्धांतने क्रीडा शिक्षक विजय वानखेडे सर, प्राचार्य प्रल्हाद गायकवाड सर ,सचिव गोपालसिंग राजपूत, दिनेश गर्गे सर यासह आपल्या माता पित्यांना दिले आहे.
सिद्धांत च्या निवडीने जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरावरुन सिद्धांतचे अभिनंदन होत आहे.