आत्मदफनाचा इशारा देताच वरवंड-डोंगरखंडाळा रस्त्त्याचे काम सुरु
स्वाभिमानी'चा दणका, तालुकाध्यक्ष दत्ता जेऊघालेंच्या आंदोलनाला यश
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – भादोला ते वरंवड आणि वरवंड ते डोंगर खंडाळा रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय जेऊघाले यांनी आत्मदफनाचा इशारा देताच वरवंड ते डोंगरखंडाळा कामाला सुरुवात झाली आहे.
बुलडाणा ते उद्री रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे, मोठ्या प्रमाणात रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे वरवंड ते डोंगरखंडाळा या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जेऊघाले यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात उपोषण केले होते. त्यानंतर सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन कामाला सुरुवात देखील करण्यात आली. वरवंड फाटा ते वननाका हे खामगाव मार्गावरील काम पूर्ण झाले तर डोंगर खंडाळा ते वरवंड आणि वरवंड ते भादोला हे काम अर्धवट करुन पुन्हा बंद करण्यात आले. याबाबत वारंवार मागणी करुनही संबंधित विभाग आणि कंत्राटदाराने दुर्लक्ष केले होते. अखरे दत्तात्रय जेऊघाले यांनी १६ ऑक्टोबर रोजी आत्मदफनाचा इशारा दिला. या इशाऱ्याने संबंधित विभाग आणि ठेकेदाराला खडबडून जाग आली आणि इशारा मिळताच आजच्या आजच कामाला सुरुवात देखील झाली. ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने रस्त्याचे काम सुरु झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.