Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली
रानडुकरांनी केली शेकडो एकर शेतातील कपाशी फस्त
वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांचा त्रास
खामगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात लाखनवाडा गावात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. शेतात उभे असलेले कपाशीचे पीक रानडुक्कर फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
आधीच शेतकऱ्याची पिके पाण्या अभावी माना खाली टाकत आहेत, त्यात वन्य प्राणी रोही,रान डुक्करांचा त्रास शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या वन्य प्राणी नासधूस करून हिरावून घेत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.