मेरा खुर्द शिवारात अज्ञात इसमानाने सोयाबीनची सुडी पेटवली लाखोचे नुकसान
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- चिखली तालुक्यातील मेरा खुर्द शिवारामध्ये गट नंबर 70 मध्ये देवकाबाई भानुदास भगत राहणार रामनगर यांच्या शेतातील अज्ञात इसमाने काल संध्याकाळी आठ वाजता शेतातील सोयाबीनच्या गंजेला आग लावून दिली आहे त्यामुळे रामनगर येथील देवकाबाई भगत यांचे अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आज शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटशी लढत असताना एक वेगळेच संकट रामनगर येथील शेतकऱ्यावर उद्भवले आहे त्यामुळे शेतकऱ्याची मनस्थिती दुभागली आहे त्याला शासनाच्या योजनेतून लवकरात लवकर लाभ मिळाला पाहिजे अशी हळहळ मेरा खुर्द रामनगर व इतर शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे मेरा खुर्द मंडळाचे तलाठी बद्रीनाथ वानखेडे व कृषी सहाय्यक संतोष किंगरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठाकडे सदर प्रकरण पाठवले आहे तरी या शेतकऱ्याला लवकरात लवकर शासनाची मदत मिळावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे