चिखली आगाराला आले गरिबीचे दिवस..
डिझेल अभावी अनेक बसेच ऊभ्या, प्रवाशांचे हाल
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलडाणा जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या चिखली आगारावर गरिबीचे दिवस आल्याचे पहावयास मिळत आहेत. या आगारात डिझेल ऊपलब्ध नसल्याने अनेक बसेस ऊभ्या असल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना जास्त पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून एसटी बसेस साठी डेपोतच पेट्रोल पंप अभारण्यात आलेले आहेत. परंतु अनेकदा आर्थीक अडचणींमुळे किंवा नियोजनाच्या अभावाने डेपोतील पंपावर डिझेलचा तुटवडा असतो. त्यातच कालपासून डेपोतील पंपावर डिझेल नसल्याने ग्रामिण भागातील अनेक एसटी बसच्या फे-या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करून शिल्लकचे पैसे मोजून खाजगी वहानाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र काल दिवसभर पहायला मिळाले असून परत एकदा एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. चिखली आगाराला रोज चार हजार लिटर डिझेल लागते. तर काल दुपारपासून डिझेल नसल्याने अनेक बस फे-या रद्द करण्यात आल्यात. व याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलने झाले आहे. चिखली आगार प्रमुख श्री ईलामे
जर चिखली बस आगारात डिझेल उपलब्ध झाले नाही तर एकही बस आगाराबाहेर जावू देणार नाही, शिवसेना ऊप जिल्हा प्रमुख कपिल खेडेकर.या संदर्भात शिवसेना ( उबाठा ) चे ऊपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांना माहिती मिळताच त्यांनी एसटी बस आगारात जावून प्रवाशांची चोकशी केली असता, प्रवाशांनी आम्ही तिन ते चार तासापासून गावाला जाण्यासाठी एसटी बससाठी डेपोत डिझेल नसल्याने आम्ही बस स्थानकावर ताटकळत पडलेलो आहोत असे सांगीतले. त्यानंतर कपिल खेडेकर यांनी महामंडळाच्या कर्मचा-यांना चांगलेच धारेवर धरत एसटी बस आगाराचे चांगलेच वाभाडे काढत जर ऊद्या पर्यंत डिझेल ऊपलब्ध झाले नाही तर, एकही बस चिखली आगारातून बाहेर जाऊ देणार नाही असा आक्रमक ईशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी उपस्थित व्यवस्थापक कर्मचाऱ्याला दिला.