असोला येथे डेंगूचे थैमान एकच मृत्यू तर दोन पेसेंट संभाजीनगर येथे हालवले गावात भितीचे वातावरण.
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- एकनाथ माळेकर – चिखली तालुक्यातील असोला बुद्रुक येथे डेंग्यू सदृश्य तापेमुळे असोला बुद्रुक येथे चांगलाच जोर पकडला आहे त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकाचा मृत्यू तर असोला बुद्रुक येथील अमोल सुर्वे यांचा मुलगा व सुनील राठोड यांची मुलगी संभाजीनगर येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये भरती केली असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील नदीम शेख यांची मुलगी तर अशपाक शेख यांचा मुलगा चिखली येथे भरती आहे तर श्रावणी ज्ञानेश्वर चव्हाण हि मुलगी सुद्धा चिखली येथे संतकृपा हॉस्पिटलमध्ये भरती आहे संदीप खेडेकर यांचा मुलगा सुद्धा चिखली येथील खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलेला आहे. असोला येथील दिनेश सुभाष लोखंडे सामाजिक कार्यकर्ते यांनी यापूर्वी असोला बुद्रुकचे ग्रामसेवक श्री सवडतकर यांना वेळोवेळी फोन करून गावांमध्ये फवारणी करण्याची विनंती केली असता त्यांनी जिल्हा परिषद मध्ये पंप मिळत नाही त्यामुळे गावात धूळ फवारणी करीत येत नाही आसे उडवडीचे उत्तरे मिळत होते आज जी डेंगूसदृश्यतापची परिस्थिती उद्भवली आहे त्याला पूर्णतः ग्रामपंचायत सचिव व प्रशासक हेच जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे डेंगू सदृश्य पेशंटच्या वडिलाला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी आमच्या गावांमध्ये जलस्वाराची टाकी आहे त्या टाकीमधील पाणी गावात पिण्यासाठी वापरतात परंतु त्या टाकीमधून येणारे पाणी काही दिवसापूर्वी हे पूर्णतः पिवळे आले होते व ते गावातील नळाद्वारे लोकांच्या पिण्यात आले होते.
सध्या सोयाबीनचा सीजन असल्यामुळे सर्व लोक हे नळाचे पाणी पितात त्यामुळे डेंगू सदृश्य तापेचे पेशंट असोला बुद्रुक येथे निघत आहे नळाचे पाणी जर दोन दिवस भांड्यामध्ये भरून ठेवले तर तिसऱ्या दिवशी त्यामध्ये जीव तयार होतात त्यावरून असे लक्षात येत आहे की सदर टाकीमध्ये येणारे पाणी हे घाण मिश्रित असून पाईपलाईन कुठेतरी लीकीज असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे नदीम शेख असोला बुद्रुक. 17 ऑक्टोबर रोजी शेळगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपूर्ण टीम व सात रोग नियंत्रणाचे अधिकारी यांनी असोला बुद्रुक येथे जाऊन संपूर्ण गावाची तपासणी केली आहे त्यामध्ये त्यांना मोलाचे सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गजानना वायाळ यानी आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पूर्ण टीम असोला बुद्रुक येथे बोलवण्यात आली होती या कामी गावातील दिनेश सुभाष लोखंडे रविंद्र देवदास नवले साजित रुस्तुम पटेल अमिन पटेल योगश शिवाजी नवले अविनाश सुर्वे शरद गोलंडे मोतीराम नवले अमोल सुर्वे आलमगीर शेख गणेश लोखंडे निसार पटेल विशाल नवले विकास सुर्वे तसलिम शेख व राजु चव्हाण नवले पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.