शेतकऱ्याला सोयाबीनला आर्थिक मदत द्या व कोरडा दुष्काळ जाहीर करा लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीची मागणी
लोणार – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- (राहुल सरदार)- लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने
दिनांक १६/१०/2023 रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या आदेशाने लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आर्थिक मदत घोषित करा व बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करा तसेच सोयाबीनच्या विविध प्रश्नाबाबत लोणार तहसीलचे तहसीलदार गिरीष जोशी यांना निवेदन देण्यात आले
बुलडाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सोयाबीनच्या विविध प्रश्ना बाबत बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडलेला आहे, पर्जमान अतिशय कमी झाल्याने शेतक-यांना हमखास साथ देणारे सोयबीनचे नगदी पिक हातुन निघुन गेले आहे. जिल्हयात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे, महिना संपूर्णत: कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याला पावसाला सुरुवात झाली, चाँही गि पडत असल्याने १५ ते २० मी.मी. पेक्षा जास्त पाऊल पडला नाही, रिमझिम पावसात शेतक-यांनी पेरणी केली, शेतही अंकुरलं पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठा खंड पडल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातही सप्टेंबर महिन्यात १५ दिवसाच्या अंतराने पाउस पडला त्यावेळी पिकं तग धरून होती. पण फळदाणीसाठी फुलं महत्वाचे असतांना ती गळून पडत होती. ओलीताची व्यवस्था असणा-या शेतक-यांनी स्पिक्लर लावुन पाणी दिले, कशी बशी पिके वाढली आणि एलो मोझक नावाच्य व्हायरसमुळे खोडआळीचा प्रार्दुभाव वाढला. त्यामुळे सोयबीन पिकाची वाटच लागली. आज शेतकरी सोयाबीनची मळणी करत असतांना झडतीचं प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. उडीद, मुग, ज्वारी, बाजरी, डी पिके कुठेच दिसत नाही, सोबत सोयबीन दिसत होती, कपासी दिसत असली तरी वाट मात्र होत नकती कपासीचं बोंड शोधुनही दिसत नसतांना जिल्हयाची आणेवारी ६५ टक्के काढण्यात आली आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतक-यांमध्ये चिंता वाढली आहे तर अनेकांचा सोयबीन पिकांचा खर्च निघणेही अवघड आहे.
जिल्हयातील बहुतांशी शेतकरी अडचणीत असल्यामुळे नविन सोयबीन बाजारात विकासाठी आणत आहे. परंतु व्यापारी दर पाडुन खरेदी करत असल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणापत नुकसान होत आहे काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नविन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सोसाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा म्हणजे (प्रति क्विंटल ४६००) ५०० ते ७०० रुपये कर्मी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. किमान दर ३९०० पर्यंत असल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. याकरिता
खर्च २० हजार उत्पादन १६ हजाराचे : जिल्हयातील सोयाबीन हे मुख्य नगदी पिक आहे, हजारो एकर क्षेत्रावर शेतक-यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, साधारणत: शेतक-यांना पेरणीसाठी एकरी बियाणे ३० किलो लागते, खताचा खर्च १ हजार रूपये, बियाणे खर्च १ हजार रूपये, निंदण २ हजार रूपये, फवारणी खर्च २ हजार रूपये, शेतक-याची मजुरी ५०० रोज या प्रमाणे तिन महिन्याचे १२५०० रूपये, आणि एकरी काढणी ३ हजार रूपये, मळणीयंत्र एका पोत्याला २०० रूपये असा शेतक-यांचा एकुण २० हजार रूपये खर्च झाला आहे.
बुलडाणा जिल्हयात कोरडा दुष्काळ पडलेला आहे, पर्जमान अतिशय कमी झाल्याने शेतक-यांना हमखास साथ देणारे सोयाबीनचे पिक हातुन निघुन गेले आहे. एकरी ४ क्विंटलचे उत्पन्न होण्याची शक्यता असल्यामुळे शेतक-यांना सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची गरज आहे. अनेक शेतक-यांनी शासनाच्या धोरणा प्रमाणे १रूपयाचा पिक विमाचा भरणा केला असुन त्यामुळे पिक विम्याची रक्कम शेतक-यांच्या हक्काची आहे. पिक विम्याची हक्काची रक्कम तातडीने शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. एलो मोझॅक या रोगामुळे सोयाबीनचे खुप नुकसान झाले आहे. पाउस कमी झाल्यामुळे रब्बीची पिके येण्याची आशा धुसर झाली असुन दुसरे कोणतेही पिक आता शेतक-यांच्या हाती राहले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल असुन अतिशय चिंताग्रस्त झाले आहे. सोयाबीनचे उत्पन्न अतिशय कमी होत असल्यामुळे लागवडीचा खर्च निघणे कमी झाले आहे. शेतक-यांना तातडीने युध्द पातळीवर भरीव मदत देवुन दिलासा देण्याची गरज आहे.
तरी बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून पिक विम्याची हक्काची रक्कम व नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात यावी, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमकपणे जिल्हाभर जेलभरो, रास्तारोको तसेच सत्ताधा-यांना रस्त्यावर फिरू दिल्या जाणार नाही. त्यामुळे शासनाने तातडीने मदत देण्याची विनंतीही निवेदनादर घेण्यात आली यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी कोषाध्यक्ष शांतीलालजी गुगलीया, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी,गटनेते भूषण मापारी, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदीप संचेती, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, नगरसेवक संतोष मापारी, माझी शहर अध्यक्ष नितीन शिंदे,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे शहर काँग्रेस कमिटीचे रामचंद्र कोचर,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मापारी, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, सचिव गौरव धुमाळ,महिला अध्यक्ष सौ ज्योती राठोड, असंघटित सेलचे शहराध्यक्ष शेख अफसर शेख तुराब, प्रकाश चव्हाण,मुमताज भाई, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते