लोणार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी प्रमोद वराडे कार्याध्यक्षपदी गोपाल तोष्णीवाल उपाध्यक्षपदी श्याम सोनोने सचिव पदी सचिन गोलेछा यांची अविरोध निवड
लोणार :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- (राहुल सरदार)- लोणार तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणी च्या निवडी साठी स्थानिक विश्रामगृह येथे 15/10/23 रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद याच्या अध्यक्षते खाली सभा आयोजित करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलढाणा जिला मराठी पत्रकार संघ डॉअनिल मापारी ,जिला संघटनेचे उमेश पटोकार,व विठ्ठल घायाळ होते
सर्व प्रथम सभे च्या सुरवातीला पत्रकारांचे आराध्य दैवत बाळशास्त्री जांभेकर याना पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलडाणा जिला मराठी पत्रकार संघ डॉ अनिल मापारी, उमेश पटोकार, राहुल सरदार, विठ्ठल घायाळ , यांनी मार्गदर्शन केले व नवीन कार्यकारणी ला शुभेच्छा दिल्या सोबतच, सर्व उपस्थित सदस्यनी नवीन कार्यकारणी च्या निवडीचे सर्व अधिकार जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलढाणा जिला मराठी पत्रकार संघ डॉ अनिल मापारी यांना सर्वानुमते देण्यात आला त्यांनी सर्व सदस्यशी चर्चा करून नवीन कार्यकारणीची घोषणा केली
अध्यक्ष:- प्रमोद वराड, कार्याध्यक्ष :- गोपाल तोष्णीवाल सचिव :- सचिन गोलेच्छा उपाध्यक्ष:- श्याम सोनुने उपाध्यक्ष:- रमेश खंडागळे, बीबी कोषाध्यक्ष:- किशोर मोरे , दाभा सह कोषाध्यक्ष :- अशोक इंगळे सह सचिव:- अनिल वायाळ, पिंपळखुटा सह सचिव:- किशोर मापारी प्रवक्ता :- राहुल सरदार प्रसिद्धी प्रमुख :- शेख यासिन अशी घोषित केली
नवीन कार्यकारणी ची घोषणा होताच नवीन अध्यक्षाचा तथा कार्यकारणी ची सत्कार करण्यात आला ,नवीन अध्यक्ष यांनी जेष्ठ मार्गदर्शक तथा सचिव बुलढाणा जिला मराठी पत्रकार संघ डॉ अनिल मापारी, मावळते अध्यक्ष शेख समद , मावळते सचिव पवन शर्मा, यांचा सत्कार केला त्यावेळी मावळते अध्यक्ष शेख समद यांनी मागील 2 वर्ष च्या कार्यकाळा मध्ये दिलेल्या सहकार्य साठी सर्वांचे आभार व्यक्त केले नवीन अध्यक्षांनी संघटनेला गत वैभव प्राप्त करून देणाच्याचे अभिवचन दिले व सर्वना सोबत घेऊन येणाऱ्या अडचणी सोडवून पत्रकार भवन तयार करण्याचा मानस व्यक्त केला या सभेचे संचालन गोपाल तोष्णीवाल यांनी तर आभार सचिव सचिन गोलेच्छा यांनी मानले यानंतर स्नेह भोजना चा आस्वाद घेण्यात आला, यावेळी सुनील वर्मा, विजय गोलेचा, संदीप मापारी, संतोष पुंड, ज्ञानू सुपेकर, प्रणव वराडे,रेहमान नौरंगाबादी, उमेश कुटे, नंदू डव्हळे उपस्थित होते