शारदा ज्ञानपीठ ची कन्या कोमल बोरसे हिची गोळाफेक मध्ये शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवङ…..
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- स्थानिक शारदा ज्ञानपीठ बुलडाणा ची विदयार्थीनी कोमल गजानन बोरसे हिने विभागीय स्तरीय गोळाफेक क्रिडा स्पर्धेत लढत देत व्दितीय क्रंमाक पटकाविला आहे. तिची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरावरुन कोमल बोरसे वर अभिनंदनाचा व कौतुकाची वर्षाव होत आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत कोमल बोरसे हिने तालुकास्तरावर प्रथम क्रंमाक, जिल्हा स्तरावर व्दितीय क्रंमाक तर विभागीय स्तरावर व्दितीय क्रंमाक पटकावित राज्यस्तरीय स्पर्धेला निवड झाली असुन तिने या यशाचे सर्व श्रेय शारदा ज्ञानपीठ चे क्रिडा शिक्षक राहुल औशलकर सर व अजय राजपुत सर यांना देते व खाजगी प्रशिक्षक सुदाम बोरसे सर यांना देते.
तिच्या या यशाबददल बुलढाणा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ. विद्यानंद देशपांडे, उपाध्यक्ष अॅड. तुषार महाजन, सचिव अॅड. रामानंद कविमंडन शाळेचे व्यवस्थापक अॅड. आनंद चेकेटकर व सर्व माननीय संचालक मंडळ, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डाँ प्रमोद देशपांडे, शाळेच्या प्रशासक जगताप मॅडम, मुख्याध्यापिका अंतरकर मॅडम, उपमुख्याध्यापक दिपक देशपांडे, गिरीश चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.