शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उद्रेक महामोर्चा – डॉ. गोपाल बच्छिरे
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा उद्रेक महामोर्चा लोणार येथील तहसील कार्यालयावर धडकेल असा इशारा डॉ गोपाल बच्छिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
शेतकऱ्यांचे गत तीन वर्षापासून दुष्काळाचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.पीक विम्याची नुकसान भरपाई विना कंपनीने अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही व जी दिली ती तुटपुंजी आहे पूर्ण पीक विमा शेतकऱ्यास देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जो होल्ड लावण्यात आलेले आहे ते खुले करावे.
अतिवृष्टीची आर्थिक मदत अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही ती सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी.ट्रॅक्टर अथवा दुसऱ्या कारणासाठी शेतकऱ्यास मिळणारी कृषी विभागाकडून मिळणारी सबसिडी गत दोन वर्षात दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी. वर्ष 2012-13 मधील पीक कर्ज माफी योजना अंतर्गत व 2016-17 मध्ये जाहीर केलेली पीक कर्जमाफी योजनेचा लाभ निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यास मिळालेलाच नाही ते त्वरित देण्यात यावा.वन्यप्राणी उदाहरणार्थ रोहि (निलगाय) जंगली डुकरे, हरीण यांच्याकडून झालेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देऊन वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची सुटका करण्यात उपाय योजना करावी.
शेतकऱ्यास विना खंड अखंडपणे आठ ते बारा तास शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात यावा.
उपरोक्त शेतकरीराजाच्या संबंधित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या अन्यथा शासन व प्रशासन यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीच्या माध्यमाने लोणार येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा उद्रेक महामोर्चा धडकविण्यात येईल याची शासन व प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी या प्रसंगी
प्रा.डॉ.गोपालसिंह बछिरे ॲड.दीपक मापारी गजानन जाधव सर कैलास अंभोरे श्रीकांत नागरे परमेश्वर दहातोंडे विजय मोरे सर तेजराव घायाळ सुदन अंभोरे सर शाम राऊत तानाजी मापारी गोपाल मापारी लूकमान कुरेशी जीवन घायाळ श्रीकांत मदनकर उमर सय्यद इकबाल कुरेशी किसान आघव राजू दहातोंडे राजूभाऊ बुधवत सुभाष पुरी रमेश भानापुरे बंडूभाऊ जोगदंड गफ्फार शाह लालूभाई शेख वासिम शेख विनोद थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते