रोहडा फाट्या पासून ते रोहडा गावा पर्यंत रस्त्याची झाली दयनीय अवस्था,
तपोवन देवी मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ही करावा लागतोय त्रस्त सहन, प्रशासन रस्त्याकडे लक्ष देतील का भक्तांनाही पडला प्रश्न ….
चिखली (एकनाथ माळेकर- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – चिखली तालुक्यातील रोहडा येथील रेणुका माता मंदिर हे संबंध बुलडाणा जिल्हा नवे पूर्ण महाराष्ट्र वासियांचे श्रद्धा स्थान आहे दर वर्षी नवरात्र मध्ये येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात भाविकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून सदर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे रस्त्यामध्ये मोठ मोठी खड्डे पडले आहेत त्यामूळे हया रस्त्याने प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे वाहन चालकांना वाहने चालविणे अशक्य झाले आहेत. मागील काही दिवसापूर्वी मेरा खुर्द येथील विश्राम गृह येथे आमदार राजेंद्र शिंगणे साहेबांचा जनता दरबार सुरू असताना रोहडा ग्राम वासीयानी सदर रस्ता दुरुस्ती ची मागणी केली होती आमदार महोदयांनी प्रशासनाला काम सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु सदर काम आजुन सुरू झाले नाही काही तरी डांबर रोडवर मुरूम टाकून थातूरमातूर काम कोणीतरी केलेले आहे रोहडा फाटा च्या सुरुवातीला थोडासा मुरून टाकून दिखाऊ काम या रोडचे शंभर दीडशे मीटर झालेले आहे परंतु त्याच्या समोर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती या रोडची झालेली आहे
या ठिकाणी बुलढाणा जिल्हा नवे संपूर्ण महाराष्ट्र मधून देवीचे भक्त नवरात्र उत्सवामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात परंतु येथे आल्यानंतर या रोडची अवस्था पाहून त्यांचा उत्सव हा हिरमुसल्यासारखा होत आहे नवरात्र संपण्याची वेळ आली परंतु या रोडला मुहूर्त सापडला नाही कोणीतरी जालना येथील ठेकेदार यांनी तात्पुरते मुरूम टाकून जखमेवर मलम केल्यासारखे काम सुरुवातीलाच शंभर दीडशे मीटरपर्यंत केले आहे परंतु त्यासमोर पूर्ण रोड खराब झालेला आहे त्यामुळे येथे अपघात होण्याचेही परिस्थिती निर्माण झालेली आहे चिखली तालुक्यातील तपवन देवी संस्थाने या भागातील आराध्य दैवत असून येथे सर्व जाती धर्माचे लोक या परिसरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात परंतु या रोडचे अवस्था पाहून परत न आलेले बर असे अवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांच्या मुळे झाली आहे मेरा खु येथे जनता दरबार मध्ये सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अधिकारी यांना सांगुन सुद्धा त्यांनी नवरात्र उत्सवामध्ये रोडचे काम केले नाही जनता दरबारात घेतल्या ठरवायला सुद्धा बांधकाम विभाग बुलढाणा यांनी केराची टोपली दाखवली आहे असे या प्रकारावरून दिसून येत आहे नवरात्र असुन सुध्दा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गजानना वायाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा कार्यकारी अभियंता राऊत साहेबांची भेट घेवून सदर रस्त्याची दुरुस्ती चे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली असता साहेबांनी दोन दिवसात काम सुरू करण्याचे आदेश उपअभियंता उप विभाग देऊळ गाव राजा यांना दिला असल्याची माहिती सुद्धा अनेक वर्तमानपत्र मधून प्रकाशित करण्यात आली होती परंतु रोहडा फाटा ते रोहडा गाव रस्त्याची दुरवस्था अतिशय दयनीय झाली आहे या रोडहून जाणारी प्रवासी सह भक्तांमध्येही त्रास सहन करावा लागत आहे .