Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली
देव तारी त्याला कोण मारी! आईबाबा शेतात कापूस वेचणी करत होते,तेवढ्यात तीन वर्षीय आराध्या ‘वर’ ताडसाचा हल्ला!
पातोंडा पेडका शिवारातील घटना!
खामगाव(आपलं बुलढाणा जिल्हा बातमी): अस म्हणतात न देव तारी त्याला कोण मारी अशीच एक घटना खामगाव तालुक्यातील पातोंडा (पेडका) शिवारात घडली आहे.शेतात कापूस वेचणी करण्यासाठी परशराम महादेव कटोने (वय ३५ वर्षे रा. पातोंडा) हे आपल्या पत्नी, मुलगी आराध्या (वय ३ वर्ष) हिच्यासोबत आज २४ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान गेले होते. परशराम काटोने हे शेतात कापूस वेचणी करताना मुलगी आराध्या बाजूला खेळत होती. याचवेळी तडसाने आराध्य ‘वर’ हल्ला केला . तेवढ्यात बाजूला शेतात काम करणाऱ्या भानुदास रामदास मुंडाले ( पेडका ) यांनी तडसाला हकालुन लावले. त्यामुळे आराध्याचा जीव वाचला. आराध्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.