शिवप्रेमींची जिल्हाधिकारी कार्यालया पुढे तीव्र निदर्शने..
सरकारने इतिहासाशी खेळणे थांबवावे --डॉ. मनोहर तुपकर
बुलढाणा -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय पूर्वी फडणवीस सरकारने घेतला तोच निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. आता दत्तक शब्द योजला आहे. हा शब्द खेळ आहे. सरकारने इतिहासाशी खेळणे थांबवावे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.येथील किल्ल्याचे पावित्र्य भंग करणारा निर्णय महाराष्ट्र कदापी खपवून घेणार नाही. याची किंमत मोजावी लागेल. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मनोहर तुपकर यांनी केले.
शिवप्रेमी विचार मंच बुलडाणा द्वारा गढ किल्ले खाजगी व्यक्तीस दत्तक देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीव्र निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ ,एडवोकेट जयश्रीताई शेळके, डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर,अमोल रिंढे, सुनील जवंजाळ पाटील, प्राध्यापक शाहीनाताई पठाण,प्रमोद टाले, प्राचार्य संजीवनी शेळके, आशा शिरसाठ, प्रतिभा भुतेकर, प्रा.अमोल वानखेडे, पीएम जाधव, एडवोकेट सतीशचंद्र रोटे, मोहम्मद सोफियान, अशीष गायकी, सुरेश सरकटे ,सुजित देशमुख, जाकीर कुरेशी, एडवोकेट प्रकाश जाधव, कुमारी के.एस. पंडित, ऍडव्होकेट संदीप जाधव, गणेश उभरहांडे,सोहम घाडगे, गजानफर खान, पिक गौरव देशमुख, रामदास शिंगणे, मिलिंद वानखेडे आदींची उपस्थिती लाभली.यावेळी बोलताना डॉक्टर तुपकर यांनी सरकारच्या खाजगीकरणाचा चांगलाच समाचार घेतला. शिवप्रेमीच्या भावनाशी खेळू नका अन्यथा हे शिवप्रेमी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा इशारा त्यांनी दिला. संचलन सुनील सपकाळ यांनी तर आभार मनसेचे नेते अमोल रिंढे पाटील यांनी मानले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निर्णय त्वरित मागे घ्यावा– डी एस लहाने
गड किल्ले खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये. गड किल्ले भाड्याने देण्याची बाब नाही. यामागे शिवरायांचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या भावना आहेत. असे निर्णय हितावह नाही. सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा असे प्राध्यापक डी एस लहाने यावेळी बोलताना म्हणाले. तर एडवोकेट जयश्रीताई शेळके यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. प्राध्यापक संजीवनी शेळके, शाहीनाताई पठाण यांनी परखड भाष्य केले.
हा तर तुघलकी निर्णय– सुनील सपकाळ
काही निर्णय इतिहासात गाजले आहेत. त्यातला एक तुघलकी निर्णय आहे. वास्तवाचे भान न ठेवता घेतला गेलेला निर्णय म्हणजे तुघलकी निर्णय. सध्या सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. गड किल्ले इतरांच्या ताब्यात देण्याचा. हा निर्णय घातक ठरणार आहे. या मुळे किल्ले,जुन्या वस्तू चे पवित्र राहणार नाही. असे मत शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ यांनी व्यक्त केले. सरकार कशाचेही खाजगीकरण करत आहे त्यातून आता महाराजांचे गड किल्ले देखील सुटले नसल्याचे सांगून सपकाळ यांनी शासनाचे निर्णयावर कठोर टीका केली.मनसेचे अमोल रिंढे ,मराठा सोयरिकचे सुनील जवंजाळ पाटील यांनी आक्रमक घोषणा बाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.