शिवसेनेचे (उ.बा.ठा.) बुलढाणा युवासेना उपतालुका प्रमुख राहुल शेलार यांचा ‘स्वाभिमानीत’ प्रवेश
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- शिवसेनेचे (उ.बा.ठा.) बुलढाणा युवासेना उपतालुका प्रमुख राहुल शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी परिवारात प्रवेश घेतला. रविकांत तुपकर यांनी त्यांचे स्वागत केले.
राहुल शेलार हे तळागाळातील लोकांसाठी काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत (उ.बा.ठा.) बुलढाणा युवासेना उपतालुका प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. परंतु आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथे त्यांचा प्रवेश पार पडला. यावेळी रविकांत तुपकर यांनी त्यांचे संघटनेत स्वागत केले. त्यांच्या प्रवेशामुळे चळवळीची ताकद निश्चितच वाढणार आहे. तरुणांनी शेतकरी, शेतमजुर यांच्या हितासाठी शेतकरी चळवतीला बळकटी देणे गरजेचे आहे. राहुल शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी चळवळीत प्रवेश करत शेती आणि मातीसाठी कटीबद्ध असल्याचे सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अॅड.राज शेख, पवन देशमुख, दत्तात्रय देशमुख, आकाश माळोदे, गजानन देशमुख, मधुकर शिंगणे, पवन काकडे,शेख अमीन, रशीद लाला, विश्वास शेळके, जयपाल प्रधान यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.