Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

असोला बु येथील १२ वर्षीय युवकाचा मृत्यू….

Spread the love

 

चिखली:-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- चिखली तालुक्यातील असोला येथील कुणाल गजानन चव्हाण वय वर्ष 12 यांचा संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटल येथे शिंकशेल या आजार मुळे मृत्यू झाला आहे आसोला बु येथे पहिलेच डेंगूच्या बाबतीत चर्चेत असतानाच परत एकदा बारा वर्षाच्या युवकाचा संभाजीनगर येथे मृत्यू झाला आहे त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले कुणाला वर्ग सातवी मध्ये आसोल बु‌ येथे मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होता एक हासत मुख विद्यार्थी तसेच कोणत्याही खेळात प्रवीण असलेला विद्यार्थी मृत्यू होण्यापूर्वी चिखली येथे दोन दिवस व संभाजीनगर येथे तीन दिवस औषध उपचार सुरू असतानाच अचानक कुणाल यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे असोला येथे आणखीनच भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. डेंगू सदृश्यतापीमुळे युवकाचा मृत्यू झाले असल्याची गावात चर्चा सुद्धा सुरू आहे चिखली येथे डॉक्टर धनवे यांच्या येथे उपचार घेत असताना डॉक्टर धनवे यांनी त्यांना संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटल येथे ताबडतोब हलवण्याचे सांगितले होते संभाजीनगर येथे एमजीएम हॉस्पिटल मध्ये दोन दिवसात सदर युवकाचा मृत्यू झालेला आहे. असोला बु येथे जल स्वराज योजनेअंतर्गत सदर गावाला पाणीपुरवठा होत आहे सध्या पाण्यामुळे गावांमध्ये सातीच्या रोग पसरवीत आहे जलस्वराज्य टाकीचे अर्धवट काम झाल्यामुळे त्यामध्ये टाकीवर जाण्यासाठी रस्ता नाही तसेच जलस्वराजच्या विहिरी वर जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही गावामध्ये भरपूर ठिकाणी घाण पाणी लोकांच्या पिण्यामध्ये येत असल्यामुळे साथीचे रोग वाढत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page