मामाचे स्वप्न अखेर भाशाने केले पुर्ण…
सोनार समाजातील कष्टाळू युवा राहुल सुभाष निंबकर यांची सैन्य दलात जीडी पदी निवड
चिखली -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा गावाचा सुपुत्र राहुल सुभाष निंबकर हा भारतीय सैन्य दलात दि २८ ऑक्टोबर २०२३ रोजी Army GD मध्ये Training centre Beg khadi pune येथे रुजू झाला.राहुल निंबकर हा सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथिल रहिवासी असून वडील सुभाष निंबकर हे मोलमजुरी करीत आपला कुटुंबाचा गाडा चालवत घरची परिस्थिती खुप हालाकिची असुन सुद्धा आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कमी कधी पडू दिली नाही.त्याचाचं आदर्श घेत त्याचा मुलगा राहुल सारख्या ह्या युवाने आज ती अनेक संकटाला मात करत आज त्यानें आई वडीलांची मान उंचावली राहुल हा अत्यंत मेहनतीने घरची परिस्थिती नाजूक असताना पुर्ण भार मामा गजानन पडोळकर चांडोळ यांनी उचलला होता.व राहुलला खुप आधार मिळत गेला.राहुलचे शिक्षण लहानपणा पासून मामाच्या येथे चांडोळ येथे झाले.श्री शिवाजी इंग्लिश स्कूल चांडोळ येथे ९ ते 10 वी पर्यंत शिक्षण घेतले आणि 11वी ते इतर शिक्षण राजश्री शाहू जुनिअर कॉलेज मसला येथे पुर्ण केले.राहुलला लहानपणापासूनच आर्मी मध्ये जाण्याचा खुप छंद होता.शेवटी खूप मेहनत करून त्याने समाजात आज नावलौकिक करुण आई वडीलांची,मामाची,समाजाची मान उंचावली यावेळी सैन्य दलात रुजू होण्यासाठी चांडोळ येथील अनेक मित्र मंडळ,शिक्षक, समाजबांधव उपस्थित राहुन उदार अंतःकरणाने कौतुक करत राहुलला निरोप दिला या प्रसंगी मित्र मंडळ कुटुंबातील सदस्य भावुक झालेले बघायला मिळाले.व वाघाळा येथिल गावकरी सुध्दा मोठ्या मनाने कौतुक करत होते.