ठाणेदार दुर्गेश राजपूत यांची उल्लेखनिय कामगिरी
चिखली (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी पोलीस स्टेशन रायपुरचे ठाणेदार म्हणुन माहे जुलै मध्ये
प्रभार स्विकारला होता. तेंव्हापासुन आजपावेतो त्यांनी अवैध धंदे, गुन्हे तसेच सामाजीक बांधीलकी या सर्व बाबीमध्ये त्यांनी वेगळाच ठसा उमटवला आहे. तसेच अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करून ठेवले आहे. त्यामध्ये त्यांनी आजपावेतो अवैध धंदयामध्ये दारू व जुगार अश्या ४५ केसेस करून ४७,५१५/- हजारांचा मुददेमाल जप्त कररून अवैध धंदेवाल्याचे कंबरडे मोडले आहे. तसेच हातभटटी दारूवाल्याच्या साहित्याची मोठयाप्रमाणावर नासधुस करून त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. तसेच पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या हरविलेल्या इसमांपैकी ०२ पुरूष व ०१ महिला यांचा तात्काळ शोध घेवुन त्यांना त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गुन्हयांचे बाबतीत त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. पोस्टेला दाखल झालेल्या चोरीच्या ०२ घटना तात्काळ उघडकिस आणुन गुन्हयातील सहभागी असलेल्या आरोपीतांना अटक करून गुन्हयामध्ये चोरीला गेलेला ९७,००० /- रू चा मुददेमाल त्यांचेकडुन जप्त करण्यात आला आहे. तसेच पोस्टेला दाखल गुन्हयामध्ये तसेच संवेदनशिल प्रकरणात आजपावेतो एकुण ९३ इसमांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण राज्यातुन तसेच परराज्यातुन प्रसिध्द असलेल्या सैलानी बाबा दर्गा येथे भाविक मोठया प्रमाणावर दर्शनासाठ येत असल्याने वाहनांची रहदारी सुध्दा खुप असते त्यामुळे वाहतुक नियमन खुप महत्वाचे असल्याने अवैध वाहतुक असो किंवा इतर वाहतुकिचे नियम न पाळणान्या इसमांवर मोठया प्रमाणावर मोवाका अंतर्गत २२८ केसेस केल्या व ४,०९,१००/- हजारांचा दंड वसुन करून कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बांधीलकी म्हणुन सुध्दा वेगवेगळे उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत त्यामध्ये सैलानी येथे केलेली साफसफाई असो व चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे असलेल्या सेवा संकल्प प्रतिष्ठान यांचे मुख्य असलेले डॉ. पालवे यांचेशी संपर्क करून सैलानी येथे असलेले निराधर व्यक्ती तसेच गतीमंद / मतीमंद असलेले लोकांना त्यांनी सैलानी येथील मुजावर यांचे सहकार्याने तसेच पोलीस स्टॉप यांचे मदतिने त्यांना सेवा संकल्प प्रतिष्ठान आश्रमात दाखल केले आहे. तसेच पोलीस स्टेशन हददीतील ग्राम साकेगांव, खोर, माळशेंबा व अंत्रीकोळी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनानंतर त्या गावात संपुर्ण दारूबंदी केलेली आहे. त्यामुळे महिला वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.