पोरांनी आई – बापाच्या कष्टाचं चीज केलं; संकटांवर मात करत लेक आंग्निविर मध्ये भरती
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. मात्र चिखली तालक्यातील करवड गावच्या ऋषिकेश प्रभाकर गवई या युवकांनी यश मिळवत मोलमजुरी करणाऱ्या आई बापाचे पांग फेडले आहेत.
करवंद गावचे प्रभाकर गवई यांना तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा आहे . मोल मजुरी करून आई आनिता प्रभाकर गवई वडील प्रभाकर गवई यांनी मुलांना शिक्षण दिलं आणि मुलांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांची मनातून इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न त्यांच्या मुलाने पहिल्यांदा पूर्ण केले. मुलगा ऋषिकेश गवई यांनी सैन्य दलाची वर्दी घालून सेवा देण्याचा निर्धार केला. मात्र अत्यंत मागास भाग असलेल्या करवंडड गावखेड्यातून युवकाने सैन्य भरतीची तयारी करणे तितकं सोप्प नव्हतं. त्यातच तयारी करत असतांना 2020 पासून ऋषीने ध्येय सोडलं नाही..अखेर 2023 मध्ये तो आग्निविर सैन्य दलात दाखल भरती झाला आहे. मुलगा ट्रेनिंग साठी जात असताना गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले ,स्वागत करत असताना आई वडिल डोळयातून आनंदाचे आश्रु वाहत होतेअत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कठीण परिश्रम करत मुलांनी आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. सैन्य दलात दाखल झालो असलो तरी देश सेवा करण्याची मनामध्ये इच्छा होती ती पूर्ण झाली .तर वडील प्रभाकर गवई आई आणीता गवई यांनी मोठे कष्ट करून माझा मुलगा सैन्यात भरती झाला त्याचे आई – वडील म्हणून मला सार्थ अभिमान आहे.