शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा साब्रा ग्रामपंचायत सदस्याचे आमरण उपोषण
मेहकर : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मेहकर विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच त्यांनी मारहाणीसाठी पाठवलेल्या गुंडांवर ॲट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी त्यांच्याच मतदारसंघातील साब्रा या गावातील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखडे हे गेल्या तीन दिवसापासून गावातीलच बुद्ध विहार समोर उपोषणाला बसले आहेत.
गेल्या 13 ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना गावातील समस्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पास मागितले असता आमदार संजय रायमुलकर यांनी फोन करून गजानन वानखडे यांना अश्लील शिवीगाळ केली आणि काही गावगुंडाणा त्यांच्या घरी पाठऊन यांना मारहाण केल्याचे गजानन वानखडे यांनी सांगितले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दोन महिन्यापूर्वीच तक्रार करण्यात आली आहे, मात्र कारवाई होत नसल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.