या दिवाळीत शिवप्रेमिंकडून गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन
नांदुरा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी व इतिहास जपल्या जावा या हेतूने नांदुरा शहर व संपूर्ण तालुक्यात येत्या दिवाळीत गडकिल्ल्यांची प्रतिकृती व देखावे उभारणे या स्पर्धेचे शहरातील शिव विचारी संघटनांनी आयोजन केले आहे. बाल मावळ्यांनी व ( मोठ्यांनी सुद्धा ) छत्रपती शिवरायांच्या स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करावा जेणेकरून युवा पिढीसमोर शिवरायांची फक्त युद्धकलाच नाही तर त्यांनी बांधून घेतलेले गडकिल्ले किती अभ्यासपूर्ण बांधले की शत्रू कितीही बलवान असला तरी शिवरायांचा एक साधा किल्लाही मावळे सहज लढवत होते.यावरून आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवराय हे केवळ लढाया जिंकणारे राजे नव्हते तर जगातील सर्वोत्कृष्ट सिव्हील इंजिनियर व आर्किटेक्चर होते.म्हणून येत्या दिवाळीच्या सुट्टीत शिवरायांचा आणखी एक वैशिषट्यपूर्ण पैलू युवा पिढीने अभ्यासावा म्हणून गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन माँ जिजाऊ सावित्री विचारमंच,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,मराठा पाटील युवक समिती, व अभिनव कला मंच नांदुरा या शिवप्रेमी संघटनांनी आयोजित केली आहे.या स्पर्धेत वर्ग १ ते ५ एक गट, वर्ग ६ ते १० दुसरा गट व वर्ग ११ च्या पुढील सर्व वयोगट असा तिसरा गट.असून प्रत्येकी प्रथम बक्षीस ५१००/-,द्वितीय बक्षीस ३१००/-,तृतीय बक्षीस २१००/- असे तीन बक्षित व एकूण तिन्ही वयोगटासाठी एकूण ९ बक्षीस ठरविण्यात आले आहे. नांदुरा शहरात दिवाळी निमित्त गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविणाऱ्या बालकांना व तरुणांना या करिता प्रोत्साहनपर बक्षिसे व प्रमाण पत्र देवून गौरविण्यात येणार आहे .या स्पर्धेसाठी दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सर्वांनी आपापले किल्ले बनवून तयार ठेवावे.आमचे किल्ले पाहणी करणारे निरीक्षक/परीक्षक हे १० नोव्हेंबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३ दरम्यान केव्हाही किल्ल्यांची पाहणी करण्यास येऊ शकतात याची नोंद घ्यावी.
या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांची नाव नोंदणी करावी.किल्ले पाहणी करिता निरिक्षक / परीक्षक म्हणून मा. ठाणेदार नांदुरा पो. स्टे अनिल बेहरानी साहेब , मराठा सेवा संघांचे जिल्हा सचिव – सचिन तायडे साहेब , जिजाऊ सावित्री विचार मंचचे – बाळासाहेब पवार,मिलिंद पाटील सर , संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके व मराठा पाटील युवक समिती,अभिनव कला मंच व सर्व आयोजक राहतील.स्पर्धकांना त्या विषयीची माहिती वजा इतिहास विचारून , प्रथम तीन येणाऱ्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येतील.तेव्हा या मध्ये नांदुरा शहरातील व तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी भाग घ्यावा असे आवाहन या स्पर्धेच्या आयोजन संघटनांनी केले आहे.
बक्षीस देणे / नाकारणे , अंतिम निर्णय आयोजकांचा राहील . गड किल्ल्याची प्रतिकृती उभारताना सार्वजनिक रस्ता / वर्दळीचे ठिकाण , यांना अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी असावी . प्रतिकृती जवळ लाऊड स्पीकर नसावा . भपक्केदार लाइटिंग नसावी . एकंदरीतच कुणालाही त्याच्या सार्वजनिक वापरात बाधक होईल अशा प्रतिकृती उत्तम असल्यावर सुद्धा नाकारण्यात येतील.राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली बनवल्या जाणाऱ्या प्रतिकृती सुद्धा नाकारण्यात येतील . प्लॅस्टिक / फायबर यांचे निसर्ग विघटन करू शकत नाही . अशा सर्व वस्तू वापरून प्रतिकृती उभारण्यात येऊ नये. किल्ले शिवकालीन कला दर्शविणारे असावे. त्यात आधुकितेचा अतिवापर नसावा ( कायम संग्रही राहणारे पुतळे सोडून )
या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपले नाव नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करिता कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी करिता
(१) अमर रमेश पाटील – 9595086366 ,
(२) किशोर देशमुख – 7798575265,
(३)जगदीश आगरकर – 9422064456 .यांचे कडे संपर्क करावा .