अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने काढला काटा…
एका तासातच आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
लोणार (राहुल सरदार- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी)- लोणार तालुक्यातील पळसखेड येथील राजाराम गजानन जायभाये वय ३० वर्ष याचा २८ ऑक्टोंबर २०२३ च्या सायंकाळी ५ ते २९ ऑक्टोंबर २०२३ च्या सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान खून झाला या घटनेची माहिती मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लोणार पोलिसांना दिली घटनेची माहिती व फिर्याद दिली या नंतर घटनेचे गांभीर्य ओळखत सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे लेखनिक गणेश लोढे संजय जाधव अनिल शिंदे वाहतूक शाखेचे पंढरीनाथ गीते मनोज कुमार शेजुळ विशाल धोंडगे नितीन खरडे संतोष चव्हाण भाऊसाहेब मोरे चालक पोलीस प्रवीण शिंदे घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचे सूक्ष्म निरीक्षण करत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय ला पाठवण्यात आले त्या नंतर सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलीस उप निरीक्षक राजाभाऊ घोगरे यांनी आपल्या पोलीस खात्यातील अनुभव पणाला लावत तपास चक्रे वेगाने फिरवली व घटनास्थळी पोलिसांच्या सोबतच सुगावा घेण्यासाठी उभा असलेला आरोपी संतोष थोरवे वय ३७ रा. पळसखेड याला ताब्यात घेतले व त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मृतक हा अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली
या नंतर मृताचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष थोरवे विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक 30 सप्टेंबर २०२३ रोजी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीला १ नोव्हेंबर २०२३ तीन दिवस पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे व ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत