वेस्टर्न इंडीया फूटबॉल असोसिएशन मुंबई,महाराष्ट्र च्या सदस्य पदी बुलडाण्याचे एन.आर. वानखडे यांची बिनविरोध निवड
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – दिनांक २८ आक्टोंबर २३ रोजी मुंबईच्या कुपरेज फुटबॅाल मैदानावर वेस्टर्न इंडीया फूटबॅाल असोसिएशन मुंबई ची ॲड.भारत माने निवडनुक अधिकारी यांच्या नियंत्रणा खाली निवडनुक पार पडली.
फुटबॅाल असोसिएशन च्या अध्यक्ष पदी प्रफुल्ल पटेल तर उपाध्यक्ष पदी हरिश होरी, छत्रपती मालोजी राजे, विश्वजित कदम, श्रीकांत एकनाथ शिंदे तर सेक्रेटरी म्हणून किरण चौगुले व कोषाध्यक्ष पदी सलीम परकुटे याच बरोबर सभासद पदी बुलडाणा जिल्ह्याचे एमएसईबी कामगार संघटनेचे नेते तथा नालंदा वाचनालय व बहुउद्देशिय क्रीडा मंडळ सुंदरखेड बुलडाण्याचे संस्थापक अध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा फुटबॅाल असोसिएशन चे सेक्रेटरी एन.आर.(नामदेवराव) वानखडे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.
वरिल सर्व बिन विरोध सदस्याचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या निवडनूकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे फुटबॅालचे सभासद हजर होते.बुलडाणा जिल्ह्याला एन.आर.वानखडे यांच्या रूपाने वेस्टर्न इंडीया फूटबॅाल असोसिएशन च्या सदस्य पदी निवड झाल्यामुळे त्यांचे बुलडाणा जिल्ह्याच्या कामगार, क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्णमान झाले आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.