24 तासात डिप्या बदलून द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येणार…
आमदार संजय गायकवाड यांचा विद्युत मंडळाला आठ दिवसाचा अल्टिमेटम
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेकडो शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता शिवसेनेच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडत 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना डिप्या बदलून देण्यात याव्या अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वजा सूचना आमदार संजय गायकवाड यांनी दिली. सदर कामासाठी आमदार गायकवाड यांनी महावितरणाला आठ दिवसाचा अल्टिमीटर दिला आहे.
खरीप हंगामात कमी झालेला पाऊस कोरडे असणारे जलाशय विहीर, त्यात वारंवार जळणाऱ्या डीपी अर्थात विद्युत रोहित्र तसेच त्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याकडून केली जाणारी अव्वाच्या-सव्वा पैशाची मागणी तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून केली जात असलेली सक्तीची वीज बिल वसुली, या व अशा अनेक कारणांनी रब्बी पिकांसाठी महावितरणचा अंदाधुंद कारभार अडचण ठरत चालला आहे .सदर विषयाची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे केली असता या तक्रारीला गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी आज 30 ऑक्टोबर रोजी असंख्य शेतकऱ्यांच्या समवेत बुलडाणा येथील विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडकले. कार्यालय व अधिकाऱ्यांना घेराव करीत चांगलेच धारेवर धरलेराज्यात स्वपक्षाचे सरकार जरी असले तरी महावितरण कंपनीने विशेषतः शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीत जो अंदाधुंद कारभार चालवला आहे, त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे, नादुरुस्त विद्युत रोहित्र, त्यात म्हणजे डिप्या जळण्याचे प्रमाण, ते दुरुस्त होण्यासाठी लागणारा विलंब यामुळे रब्बी पीक पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे
शेतकऱ्यांची नुकसान टाळण्यासाठी महावितरण कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले तसेच कामात सुधारणा करण्यात यावी व शेतकऱ्यांचे डीपी 24 तासाच्या आत दुरुस्त करून उपलब्ध करून द्याव्यात आदी मागण्या संदर्भात महावितरण कार्यालयास आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, यांच्यासह अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना, युवासेनेचे, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते