सहकार विद्या मंदिरला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक (फोर्स वन) कृष्णप्रकाशजी प्रसाद यांची सदिच्छा भेट
बुलढाणा: -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलडाणा जिल्ह्रात अत्यंत प्रसिध्द व कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणुन नावाजलेले व सध्या महाराष्ट्र राज्याचे महासंचालक (फोर्स वन) कार्यरत असलेले कृष्णप्रकाशजी प्रसाद यांनी सहकार विद्या मंदिरला भेट दिली. याप्रसंगी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेशजी झंवर, अध्यक्षा सौ. कोमल झंवर, बुलडाणा जिल्ह्राचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक महामुनी साहेब, विष्णुपंतजी पाटील, डॉ.शरदजी काळे व सुरेशजी कुळकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवर कृष्णप्रकाशजी यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाईजी यांनी केले. तरी महामुनी साहेब यांचे स्वागत डॉ.झंवर साहेब यांनी केले. सहकार विद्या मंदिरमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रेरणा मिळावी या अनुषंगाने डॉ.कृष्णप्रकाशजी प्रसाद यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम सरस्वती व दीप प्रज्वलनाने सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्याथ्र्यांनी समुहगान सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुलडाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेशजी झंवर यांनी डॉ.कृष्णप्रकाशजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे तसेच आपल्या जिल्ह्राला मिळालेले ते एक रत्न होते. त्यांच्या कार्याने, गुणाने त्यांची किर्ती सर्वत्र पसरली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजी उर्फ राधेश्यामजी चांडक यांनी बुलडाणा जिल्ह्राला मिळालेले एक कर्तव्यदक्ष, जबाबदार अधिकारी होते म्हणून सांगितले. तसेच सर्व नागरिकांच्या मनात आदरयुक्त धाक होता म्हणून सुरक्षिततेच्या बाबतीत अडचण निर्माण झाली नाही.
कार्यक्रमा अंतर्गत डॉ. कृष्णप्रकाशजी यांनी विद्याथ्र्यांना मौलिक मार्गदर्शन केले. जीवनात तुम्हाला चमकायचे असेल, झळकायचे असेल तर तुमच्या जवळ उच्च ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी त्याचा पाठपुरावा करणे, तीव्र इच्छाशक्ती बाळगणे, प्रयत्नांची कास धरणे, न हरता, न डगमगता प्रयत्नात सातत्य ठेवले तर तुम्ही यश संपादन करु शकता. या बळावर स्वत:च अस्तित्व तुम्हाला निर्माण करता येईल. आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेचा शोध घ्या, त्यात पारंगत व्हा व या जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण करा. क्षेत्र कोणतेही असो तिथे अव्वल स्थान टिकवून ठेवा. आपल्या भारतात युवा शक्ती मोठ¬ा प्रमाणावर आहे. तेव्हा आपल्या शक्तीला ओळखा. आपले मुल्य आपणच जाणा. त्याचबरोबर आपल्यातील सकारात्मक वाढविण्यासाठी आपल्याला आवडेल असा छंद जोपासा. उत्तम जीवन जगण्यासाठी विद्याथ्र्यांना त्यांनी उत्तमप्रकारे प्रेरित केले. विद्याथ्र्यांना अमुल्य असे मार्गदर्शन करीत त्यांना सतत कार्यरत राहण्याचे आव्हान केले. या तरुणांकडूनच भविष्यात भारत महाशक्ती म्हणून उदयास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच जिल्ह्राचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.महामुनीजी यांनीही आपल्या विचारातून श्री.कृष्णप्रकाशजी कसे कर्तव्यदक्ष होते. याचे विविध दाखले देऊन त्यांनी सर्वांना अवगत केले.याप्रसंगी राष्ट्रीय व राज्यस्तरावर बुलडाणा जिल्ह्राचे प्रतिनिधीत्व करुन जिल्ह्राचा सम्मान वाढविणाया विद्याथ्र्यांचा सत्कार श्री.कृष्णप्रकाशजी यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विद्याथ्र्यांसोबत पालक वर्ग देखील मोठ¬ा संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.प्रज्ञा खिल्लारे व कु. पुजा पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वंृद व शिक्षकेत्तर कर्मचायांनी अथक परीश्रम घेतले.